मृतदेह घरी नेण्यासाठी रस्ताच नसल्याने जिवनयाञा संपवून ही अहवेलना
राहुरी विद्यापीठ/जलभूमी वृत्तसेवा
देवळाली
प्रवरा येथील सतरा वर्ष वयाच्या तरुणीने पाच दिवसापुर्वी विषारी औषध
प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.सदर तरुणीवर राहुरी फँक्टरी येथे
उपचार चालू असतानातीने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ
उडाली असुन नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांच्या भोंगळा कारभार पुन्हा समोर
आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.घरी जाण्यास रस्ता नसल्याने
मृत्यूनंतर तिच्या नशिबाची अहवलेना झाली.अखेर देवळाली प्रवरा शहरातील
अमरधाम येथे अत्यंविधी करण्यात आला.
याबाबत
समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथिल पायल सुभाष मुसमाडे (वय - 17)
हिने पाच दिवसा पुर्वी राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा
प्रयत्न केला होता. पायल हिने औषध घेतल्याचे लक्षात येताच घरच्यांनी राहुरी
फँक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात
आले.तिच्यावर अतिदक्षता मध्ये उपचार सुरु असताना गुरवारी सायंकाळी 7:30
वाजता अतिदक्षता मधील कंपार्टमेंटच्या दरवाजाला साडीच्या साह्याने गळफास
घेवून आत्महत्या केली आहे. दरवाजात तरुणी आत्महत्या करीत असताना नर्सिंग
होम मधील परिचारीका व कर्मचारी कुठे होते. असा प्रश्न या निमित्ताने पुढे
येत आहे.
विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी
दाखल झालेल्या 17 वर्षाच्या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ
उडाली आहे.नर्सिंग होमचा भोंगळा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
नर्सिंग होम मधील कर्मचारी, परीचारीका ईर्मजन्सी वार्ड मध्ये बसुन मोबाईलवर
संभाषण, चँटींग, गेम आदी प्रकार सुरु असतात नर्सिंग होम मध्ये दाखल
असलेल्या रुग्णांकडे पाहण्यास त्यांना वेळ मिळत नाही.या कर्मचाऱ्यांच्या
अनेक वेळा तक्रारी करुन प्रशासन दखल घेत नाही. पायल हिच्या आत्महत्येस
जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधुन केला जात आहे. पायल
हिच्या वडीलांनी घरी जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी तहसिलदारांकडे अर्ज
दाखल केला होता. अर्जाची चौकशी करुन दाव्यात रुपांतर केले.
तहसिलदार यांनी
रस्ता देण्याचा निर्णय दिला. परंतू समोरची व्यक्ती आडदांड असल्याने
तहसिलदारांचा निर्णय मान्य नाही.असे म्हणून प्रांतधिकारी यांच्याकडे अपिल
दाखल केले आहे. मृतदेह घरी नेयाचा म्हणजे खांद्यावर किंवा झोळी करुन न्यावा
लागेल. सध्या पावसाचे दिवस असल्याने बांधावरुन मृतदेह घेवून चालणे अवघड
असल्याने नातेवाईकांनी घरा पासुन चार कि.मी. देवळाली प्रवरा मधील अमरधाम
मध्ये अंत्यसंस्कार केले. शेवटी मृत्यूनंतर हि तिच्या नशिबाची अहवेलना
झाली.राहुरी पोलीसांनी आकस्मत मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास राहुरी
पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...