मुलगी बघायला आले अन् पुरात गाडी वाहून गेली
ईश्वर वाघमारे
आखतवाडे / जलभूमी वृत्तसेवा
शेवगाव
तालुक्यातील सालवडगाव येथे मुलीला पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची
चारचाकी कार रविवारी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने सालवडगाव - जुनी
घोटण वाट ते मुर्शतपूर (धावणवाडी) या रस्त्यावर असलेल्या ओढ्याला आलेल्या
पाण्यात वाहून गेली. पावसाळ्याच्या दिवसांत पुलावरून पाणी असल्यानंतर
सावधानता बाळगणे गरजेचे आहे.दुर्दैवाने जिवीत हानी घडली नाही.
पुरात वाहून गेलेली कार
धावणवाडी च्या गावा लगत असलेल्या पुलाला अडकली. तब्बल ही कार १६ तासा नंतर
सोमवार दि.२८ रोजी सकाळी ८.३० वा. सालवडगाव च्या ग्रामस्थांच्या मदतीने
पाण्या बाहेर काढण्यात आली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जेष्ठ नक्षत्राचा
दुपारी २ ते ४ या वेळेत तालुक्यातील सालवडगाव, खरडगाव, ठाकूर निमगाव,
धावणवाडी, आखेगाव, वरूर (धाकटी पंढरी) या तालुक्याच्या उत्तर भागातील गावात
झालेल्या पावसामुळे जवळपासची तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
गावातील
जवळपास २०० ग्रामस्थांनी पाहुण्यांची ही कार पाण्या बाहेर काढण्यासाठी
सहकार्य केले. पत्रकार रामनाथ रुईकर, वारकरी जिल्हाध्यक्ष हभप रामकिसन
महाराज तापडिया, राजू काकडे, पंडित काकडे, चंद्रभान कमानदार, बाबासाहेब
टेकाळे, शरद भापकर, राधु खरड, कडू रुईकर, जग्गू वाघ, बाबासाहेब भापकर यांनी
सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...