ओबीसी नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात डावलल्याने राजीनामा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १० जुलै, २०२१

ओबीसी नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात डावलल्याने राजीनामा

ओबीसी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणेंचा राजीनामा
 
अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा

बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंकाजाताई मुंडे व खा. प्रीतमताई मुंडे यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येवून स्थान दिलेले नाही.त्यामुळे पदावर राहण उचित नाही. असे म्हणत ओ.बी.सी.युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे यांनी पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविण्यात आला.
 

जिल्हा अध्यक्ष यांच्या कडे पाठविण्यात आलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाकडून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबावर वारंवार होत आहे. मी ओ.बी.सी.युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर वर्षापासून कार्यरत आहे. पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. आमच्या नेतृत्वावर अन्याय होत असेल तर आम्ही किती दिवस सहन करायचे असे सांगत अन्यायाच्या विरोधात मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा स्वीकार करून घ्यावा. अशी विनंती ढाकणे यांनी केली आहे. 

ओबीसी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे यांनी नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात डावलल्याने नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. केंद्रीय विस्तारानंतर पहिला राजीनामा असल्याने मुंढे यांचे किती समर्थक राजीनामा देतात याकडे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची नाराजी दूर करतात की वेगळा विचार करतात हे आगामी काळातच कळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...