सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार
मजलेशहर/ जलभूमी वृत्तसेवा
शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील शिवाजी शेळके व ज्ञानेश्वर जाधव यांचा जागेचा वाद होता. गावातील वाद गावातच मिटावा अशी भूमिका घेवून सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब फटांगरे व ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मगर,स्वाभिमानी शेतकरी संघटना उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते नानासाहेब लोढे, रामकीसन खरात यांनी पुढाकार घेतला. व दोन्ही कुटुंबांना समजावून सांगत हा वाद जागेवर मिटवण्यात आल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
हा वाद गावातच मिटविल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आप्पासाहेब फटांगरे शिवाजी मगर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना युवक नेते शिवाजी मगर म्हणाले की, मजलेशहर नागरिकांनी आपआपसात कुठलाही वाद घालू नये. कुणाचे वाद असतील तर त्यांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात.आपण समंजसपणे भुमिका घेऊन गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी प्रयत्नशील राहू. यामुळे गावातील एकोपा टिकेल व शासन दरबारी गावाची प्रतिष्ठा वाढेल.
प्रत्येक गावात हा उपक्रम राबावा - फटांगरे
घराची जागा, बांधावरून पिढ्यांन पिढ्या वाद चालू आहेत. दुष्काळ, कोरोना महामारीसारखे कितीतरी संकट येत असतात. यामध्ये कधीही न भरून येणारे नुकसान होत असते. परंतु याकडे कोणी बघत नाही. परंतु वादासाठी काहीही करण्याची तयारी असते. या वादामुळे सबंध कायमचे संपुष्टात येतात. पोलीस, कोर्ट कच-या करत वेळ व पैसा नाहक वाया घालत असतो.त्यामुळे प्रत्येक समाजाने वाद न घालता गावातील प्रतिष्ठित व्यक्तीना बोलवून गावातील वाद गावातच मिटविले पाहिजे.
आप्पासाहेब फटांगरे
सामाजिक कार्यकर्ते मजलेशहर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...