मुंढे समर्थकामध्ये राजीनामा देण्यासाठी लागली स्पर्धा, राजीनामा सत्र सुरु - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, ११ जुलै, २०२१

मुंढे समर्थकामध्ये राजीनामा देण्यासाठी लागली स्पर्धा, राजीनामा सत्र सुरु

कराड, चोथे, माळवदे, डोंगरे यांचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे राजीनामे सुपूर्द
 
दिपक खोसे 
ढोरजळगांव / जलभूमी वृत्तसेवा 

केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिम गोपीनाथ मुंढे यांना मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्याने शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील पंकजाताई मुंढे समर्थक गणेश कराड यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहेे. आव्हाणे बु येथील भारतीय जनता पार्टीचे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष कचरु चोथे यांंनीही आपला पदाचा राजीनामा जिल्हाअध्यक्षाकडे सुपुर्द केला आहे. तालुक्यात मुंढे समर्थाकडुन राजीनामा सत्रच सुरू आहे. यावेळी बोलताना जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हासरचिटणीस गणेश कराड म्हणाले की. स्व. गोपीनाथ मुंढे यांनी भारतीय जनता पार्टी तळागाळात नेवुन पक्ष वाढीचे काम केले. 


त्याच स्व. मुंढे यांच्या निधनानंतर पंकजाताई व प्रतिमताई मुंढे यांना वेळोवेळी डावलण्याचे काम पक्ष नेतृत्व करत असुन लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी निवडुन येणा-या व दोन पंचवार्षीक खासदार असलेल्या डॉ. प्रतिमताई यांना मंत्रीमंडळातुन डावलल्यामुळे मुंढे समर्थाकामध्ये नाराजीचा सुर असुन आमच्या मार्गदर्शका पंकजाताईच ह्या सर्वेसर्वा असल्याचे कराड यांनी आमच्या दैनिक जलभूमी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष कचरू चोथे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंढे यांनीच मराठा समाजाला आरक्षणाची मागणी सुरूवातीला केली होती. भारतीय जनता पार्टी खेडोपाडी रूजविण्याची महत्वपुर्ण भुमिका स्व. गोपीनाथ मुंढे यांनी घेतली असतानाही त्याच्या कन्या प्रितमताई मुंढे यांना केद्रीय मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने आम्हाला कुठल्याही पदात रस नसल्याने राजीनामा दिला.



माळवदे, डोंगरे यांचे राजीनामे 

 खा.डॉ. प्रीतमताई गोपीनाथ मुंढे यांना केंद्रीयमंत्री मंडळात समावेश न झाल्यामुळे माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांचे समर्थकांनी भाजपाच्या सर्व पदांचा सामुदायिक राजीनामा देत आहेत.यामध्ये भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य गुरुनाथ माळवदे व बाळासाहेब डोंगरे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले.आलेल्या सर्व राजीनामा नाट्यावर काय पक्षश्रेष्ठी भुमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...