तहसीलदारांनी केला पंचनामा, ११ किलो चांदी शासनाकडे जमा
श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथील राजेश खटोड यांच्या घराचे, खोदकाम करताना सापडलेले गुप्तधन निघाल्या बाबत बेलापूर येथे चर्चा आहे. सोने व चांदीने भरलेला मोठा हंडा मिळून आल्याची जोरदार चर्चा गावात झाल्या नंतर बेलापूर येथील खंटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केला. त्यात त्यांनी म्हटले की, माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार रीतसर पंचनामा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर श्रीरामपुर तहसिल कार्यालय यांना आदेश देऊन तहसीलदार प्रशांत पाटील बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुप्तधनाचा पंचनामा केला आहे.
त्या पंचनामात त्यांना 11 किलो 6 ग्रँम चांदी मिळुन आली असून सदर गुप्त धन ताब्यात घेतले आहे, बेलापूर येथील खटोड आपल्या पूर्वजांनी गुप्तधन ठेवल्याची त्यांना खात्री होती. त्यावरून त्यानी अनेकदा घराच्या आवारात मजुरांकडून खोदकाम करून घेतले. अनेकवेळा केलेल्या प्रयत्नानंतर दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हे गुप्तधन प्रत्यक्षात सापडले. त्यानंतर खंटोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. आपल्याकडे काही प्रमाणात गुप्तधन प्राप्त झाले असून पंचनामा करावा. अशी मागणी त्याने केलेल्या अर्जात करण्यात आली होती. त्यानंर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी याबाबत विचारले असता बेलापुर येथिल खटोड यांचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्याने वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत. बुधवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून सदर गुप्त धन ताब्यात देऊन पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.
गुप्तधन शासनाच्या कोषागारात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे तहसीलदार पाटील म्हणाले.
बुधवारी सकाळी तहसिलदार याच्या समोर पंचनामा केल्यानंतरच हे गुप्त धन 11 किलो 6 ग्रँम चांंदी स्वरुपातील आहे.त्यात एक रुपयाची ९१५ नाणी तसेच आठ आणे व चार आणे अशी एकुण १०२० नाणी मोजदाद करताना आढळून आली. हे स्पष्ट झाले आहे.त्याची बाजाराभावाप्रमाणे किमत जवळपास आठ लाख रुपये आहे. ती जप्त करुन तहसीलदार पाटील यानी पंचासमक्ष सिल करुन जमा केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...