दहावीचा उद्या ऑनलाइन निकाल - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, १५ जुलै, २०२१

 दहावीचा उद्या ऑनलाइन निकाल

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर होणार
 
पुणे / जलभूमी वृत्तसेवा 

 राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती . अखेर निकालाची तारीख जाहीर झाली आहे. शुक्रवार दि.१६ रोजी उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे . अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल दिला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे . यासंदर्भातील माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागेल अशी माहिती दिली होती . राज्य सरकारने निकालासाठी दिलेली डेडलाईन आज संपत आहे . त्यामुळे दहावाचा निकाल लांबणीवर पडणार असल्याची शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती . परंतु दहावीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे . १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले होते . यामध्ये ९ लाख ९ हजार ९ ३१ मुल होती. तर ७ लाख ४८ हजार ६ ९ ३ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे . असा पाहा निकाल दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात . निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in fonal mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...