राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद यांचे तीन तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रम
अहमदनगर
जलभूमी वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे,महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने प्रबंधक डॉ. जितेंद्र पानपाटील यांचा आदेश प्राप्त झाला आहे.
त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्यातील 7 गावात दि. 23 ऑगस्ट ते दि. 29 ऑगस्ट पर्यन्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार पंजीकृत संस्था - जय हिंद लोककला मंच -भातकुडगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर चे कलाकार राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
यात गौरवशाली 75 वर्षे स्वातंत्र्याची, लोकशाहीची, एकतेची, विकासाची यावर आधारित कार्यक्रम ,देशभक्तीपर गीते,गौरवगाथा शहिदांची ,स्वातंत्र्यसेनानींना मानवंदना असा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सर्व कोविड चे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी देशवासियांनी यात सहभागी व्हावे. असे आवाहन माहिती भारत सरकारचे अहमदनगर क्षेत्रीय प्रचार सहाय्यक फणीकुमार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...