एकाच वर्षात तीन तरुणांच्या आत्महत्या
----------------------
कौटुंबिक नैराश्यातुन वाळवणे ता. पारनेर येथील पोस्टमन असलेल्या तरुणाने गळफास घेत आपली जिवन याञा संपवली .
याबाबत हकीकत अशी की, वाळवणे ता,पारनेर येथील पोस्टमन असलेल्या राजेश संपत ढवळे ( वय ३९ ) यांनी घरातील कौटुंबिक नैराश्याला कंटाळून मंगळवारी सकाळी ९.०० वाजता आपल्या रहात्या घरी पलगावर उभे रहात दोरीच्या साह्याने छताला गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबतची माहिती सुपा पोलिस स्टेशनला कळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भेट दिली .व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला .तेथे शवविच्छेदन केल्यावर मृतदेव नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला .
वाळवणे येथे मागील एक वर्षाच्या आत तीन तरुणानी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत . यात अनिल शिंदे ( वय ४९ ), दिंगबर शिंदे ( वय ४२ ) व काल राजेश ढवळे ( वय ३९ ) यांनी फाशी घेऊन आपली जीवन याञा संपली आहे . यातील राजेश ढवळे हा पोस्टाचे कामकाज करत होता. पंरतु कौटुंबिक कल्हातुन त्यांनी आपले जीवन संपवले असे नागरिकांमधून बोलले जात आहे,
सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली रियाज पटेल पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...