फेसबुकवर व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत एस.टी.बस समोर उडी घेऊन जीवनयात्रा संपवली
जलभूमी वृत्तसेवा
फेसबुकवर व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण युवक तालुका अध्यक्षाने एस.टी.बस समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाटयाजवळ घडली.या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश कारभारी शिंदे (वय 23) रा.आमरापूर वाघूडी, ता.पैठण असे आत्महत्या करणार्या तरूणाचे नाव आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, महेश हा मंगळवारी दि.१७ रोजी घरातील कोणाला काही न सांगता आपल्या होंडा युनिकाँर्न मोटार सायकल वर सकाळी दहा वाजेदरम्यान बाहेरगावी गेला होता.गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता.मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता हे त्याने कुणालाही सांगितले नाही. मृत्यू पुर्वी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे.माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका. अशी पोस्ट टाकली व त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुचाकी बाजूला उभी करून भरधाव जाणार्या एस.टी.बस समोर उडी घेत आत्महत्या केली.
महेशला स्थानिक नागरिकांनी तातडीने नेवासा येथील शासकीय रुग्णालयात हलविले मात्र गंभीरपणे जखमी झाल्याने व अति रक्तस्त्राव झाल्याने तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकार्यांनी महेशला मृत घोषित केले. ढाकेफळ पासुन जवळ असलेल्या आमरापूर वाघूडी, ता.पैठण येथे मुळगावी बुधवारी दुपारी महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले. शनीशिंगणापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असुन मृत्युचे कारण अद्याप समजु शकले नाही.
पोस्ट नंतर अनेकांचे कॉल कमेंटच्या माध्यमातून केली विनवणी संध्याकाळी जेंव्हा महेश ने फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली ती पोस्ट पाहून त्याच्या मित्र,जवळील नातेवाईक अशा अनेक लोकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल बंद करून ठेवला होता. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून टोकाचे पाऊल उचलू नकोस अशी विनवणी केली मात्र तो पर्यंत त्याने बस समोर उडी घेतली होती.
फेसबुकवरील पोष्ट आयुष्य खुप छान आहे परंतु जवळचे लोक sobat असतील तर माझ ही आयुष्य खुप सुंदर होत..पण कदाचित मला जगता आलं नाही मि माझ्या चुकीमूळ जगलो नाही. मला जगता आले नाही ..khup प्रेमाचे लोक भेटले. माझे मित्र एवढे ना की,कोणाचा जिव घेतिल मि म्हणलो तर.. पण असो.. माझ्या आयुष्यात.. खुप त्रास आहे. जो मी ..konala sangu shakat nhi.... pn mazi ek echha ahe माझ्या मृत्युला कोणालाही जबाबदार ठरवु नये... मी माझ्या त्रासामूळे मरतोय.... माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या जिवलगाना खुप खुप धन्यवाद ....thank u so much all' अशा आशयाची पोस्ट फेसबूक वर टाकून महेश यानी आपली जिवनयात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...