खुपटी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार
बाळासाहेब जाधव
नगर / जलभूमी वृत्तसेवा
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामानावर अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना विश्वास संपादन झाला आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा दि.३१ ऑगस्टचा अंदाजही खरा ठरल्याने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक चहात्यांनी स्टेटस ठेवले होते. डख हे प्रगतशील शेतकरी असल्याने व हवामानाचा अंदाज खरा ठरत असल्याने आपल्या तालुक्याला डख यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
त्यामुळे नेवासा तालुक्यातील खुपटी ग्रामस्थांनी पुढाकार घेत आज शनिवार दि. 4 रोजी संध्याकाळी ६ वाजता खुपटी येथे सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी डख यांच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन सोशल मिडीयातून करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...