स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकला ; कारवाई होणार ? - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकला ; कारवाई होणार ?

स्टेट बॅंकेच्या हलगर्जीपणाबददल सर्वत्र संताप
 
कर्जत / जलभूमी वृत्तसेवा 
----------------------------

देशाचा स्वातंत्र्य दिन कर्जत शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र कर्जतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तिरंगा उलटा फडकला. उलटा फडकलेला राष्ट्रध्वज पाहण्यासाठी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. स्टेट बॅंकेच्या या हलगर्जीपणाबददल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 



संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कर्जत- कुळधरण रोडलगत शहाजीनगर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. कर्जत तालुक्यातील ही एकमेव शाखा आहे. यामुळे स्टेट बँक ग्राहकांना नेहमीच हिन वागणूक देत आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेतील अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी अरेरावीची भाषा, तुच्छ वागणूक यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. या प्रकारामुळे या शाखेची रँकिंग खालावली आहे. 

शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राहकांना महत्व दिले नाही. ते यावर थांबले नाहीत त्यांनी देशप्रेम सुद्धा बाजुला ठेवले की काय ? याची चर्चा रंगली. येथील अधिकारी व कर्मचारी यांनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळयालाच दांडी मारली. येथे अवघ्या तीन कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहणा केले. ध्वजाला सलामी नाही, राष्ट्रगीत नाही. फाॅरमेलीटी म्हणून झेंडावंदन केले. 

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या बँकेच्या शाखेत उलटा ध्वज फडकवला. या प्रकाराने कर्जत व परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शिवाय सलग सुटटयांचा गैरफायदा घेत या शाखेतील अधिकार्‍यांनी ध्वजारोहणाला दांडी मारली यावरुन ते ध्वजारोहणाला किती गांभीर्याने घेतात हे अधोरेखित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...