स्मशानभूमीची भिंत उखडून पुराच्या पाण्यात भराव गेला वाहून
शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव स्मशानभुमीची स्वरंक्षण भिंत एकाच वर्षात उखडून ढोरानदीच्या पाण्याने भराव वाहुन गेला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना उघडकीस आला आहे. या कामाला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या स्मशानभूमीच्या भिंतींचे बांधकाम करून भराव करण्यात आला होता. पहिल्याच पुराच्या पाण्याने भींत उखडली असून भराव वाहून गेला असल्याने अंत्यविधीला जात्यासाठी रस्ताच राहीला नसल्याने. मृत्युनंतर ही प्रेतासह कुटुबांची कुंचबणा कधी थांबणार ? हा मोठा चिंतेंचा विषय ग्रामस्थांंसाठी बनला आहे.
ढोरजळगांव स्मशानभुमीचे काम गेल्या वर्षीच ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातुन करण्यात आले खरे.
पण पहील्याच पाऊसात ढोरानदीच्या कडेला असलेल्या स्मशानभुमित पुराचे पाणी घुसल्याने स्वरंक्षण भिंत व भराव वाहुन गेला संबधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ठ पध्दतीचे काम केल्याने मृत्युनंतरही नरकयातना भोगण्याची वेळ ग्रामस्थावर आली आहे.
गेल्या वर्षीच स्मशानभुमीच्या कामासाठी पाच लाख रूपये खर्च ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले असताना पुन्हा त्याच कामासाठी वेळोवेळी ठेकेदार बदलुन काम करण्याची मानसिकता ग्रामपंचायत घेत आहे. प्रत्यक्षात निकृष्ठ काम केलेल्या ठेकेदारांची चौकशी करून संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांंमधुन होत आहे.
ढोरजळगांव येथील ग्रामपंचायतीला इतरत्र जागा उपलब्ध असताना ढोरानदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहात स्मशानभुमी काढुन नुसत्या योजना राबविल्या जात आहे. दरवर्षी निधी खर्च करून ठेकेदाराचे घरे भरविण्याचे काम ग्रामपंचायत करत असुन ज्या ठेकेदाराने निकृष्ठ काम केले त्यांचे संबधित विभागामाफत चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
महादेव पाटेकर,
सामाजिक कार्यकर्ते, ढोरजळगांव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...