कर्जतच्या त्या पोलीसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी - ठोंबरे
नगर / जलभूमी वृत्तसेवा
कर्जत तालुक्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरीकांना धमकावुन पैशाची मागणी करत असल्याची लेखी तक्रार अर्ज अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना दहा दिवसापूर्वी देवूनही कुठलाही दखल घेतली नाही. एसपी साहेब, आपणाकडून न्याय मिळत नसेल तर न्याय मागवयचा कुणाकडे ? असा अंकुश ठोंबरे यांना पडला आहे.
मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गुन्ह्याचा तपास लावला असून शेेवगांव उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू हप्तेखोरीची तक्रार येताच तातडीने त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.
गुन्ह्याचा तपास लावण्यात मनोज पाटलांचा हातखंडा असल्याने अनेक गुन्हेगारावर कारवाई करून जेलची हवा खायाला लावली.त्या कामाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. परंतु कर्जतच्या त्या तीन पोलिसांविरोधात तक्रार अर्ज दाखल असताना कुठल्याही प्रकारची कार्यवाही ( हालचाल ) होतांना दिसत नाही. तर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी बघ्याची भूमिका घेत असल्याने जनतेमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे ? कर्जत तालुक्यातील अंकुश ठोंबरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची दि. ७ व ११ ऑक्टोबरला भेट घेऊन कर्जतच्या त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावासह लेखी तक्रार अर्ज दिला आहे. तो अर्ज पुढील तपासाकामी उपविभागीय पोलीस अधिका-यांडे पाठविण्यात आले असल्याचे ठोंबरे यांना सांगण्यात येते. ठोंबरे यांच्या तक्रार अर्जावर पुढील कार्यवाही होण्याएैवजी त्या तीन पोलिसांना पोलीस प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे.
हे प्रकरण दडपण्याचे काम पोलीसांकडून चालू आहे. तु आमच्या विरोधात दिलेला तक्रार अर्ज मागे घे.अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू. अशी धमकी पोलीस देत आहे.तु अर्ज मागे घेतला नाही तरी आमची ओळख वर पर्यंत आहे. त्यामुळे आमचे कोणी काही करू शकत नाही , तसेच वारंवार धमकी देऊन मानसीक व शारीरीक त्रास देत असल्याचे असे ठोंबरे यांचे म्हणणे आहे.
संबंधीत पोलीसांना उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पाठीशी न घालता खातेनिहाय चौकशी करुन कठोर कारवाई करावी.व आम्हाला लोकशाही पध्दतीने न्याय मिळवून देण्यात यावा. न्याय न मिळाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल.असे अंकुश ठोंबरे यांनी आमच्या दैनिक जलभूमी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...