शाळकरी मुलीचा घरातच संशयास्पद मृतदेह आढळला ? - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

शाळकरी मुलीचा घरातच संशयास्पद मृतदेह आढळला ?

अल्पवयीन मुलीचा खून, तालुक्यात खळबळ

सुरेंद्र शिंदे 
पारनेर / जलभूमी वृत्तसेवा 

पारनेर तालुक्यातील जवळे येथे बरशीले वस्तीवर १६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह तिच्या घरातच आढळून आला असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.दि.२० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षापासून या मुलीचे आई, वडील जवळे येथे वास्तव्यास आहेत. 


मोलमजुरी करून ते आपला उदारनिर्वाह चालवत होते. नेहमीप्रमाणे मुलीचे आई, वडील सकाळी मोलमजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लाससाठी निघून गेला. त्यानंतर या मुलीचा घात पात झाला असावा अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा आढळून आल्याचे सांगण्यात आले. दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

त्याने आरडा ओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले. अत्याचार करून खून ? मुलीच्या मृतदेहाजवळ एक चाकु तसेच टॉवेलच्या तुकड्याचा बोळा आढळून आल्याची माहिती पुढे आली असून चाकुचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून मुलीवर अत्याचार करण्यात आला असावा, त्यातच तिचा मृत्यू झाला असण्याची चर्चा आहे. मात्र त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुलीवर अत्याचार झाले कि नाही हे तपासणी रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...