पोलीसांविरोधातच तक्रार असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ - ठोंबरे
कर्जत पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सागर मेहेत्रे, सुनील खैरे, मनोज लातुरकर या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरीकांना धमकावुन पैशाची मागणी करत असल्याची लेखी तक्रार अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आला.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार डीवायएसपी जाधव यांनी अंकुश ठोंबरे यांना जबाबासाठी बोलवून ठोंबरे यांचा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबानुसार पोलीस प्रशासन कारवाई करणार का ?
पोलीस खात्यातीलच कर्मचारी असल्याने पाठीशी घालणार याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. पोलीस प्रशासनातील कर्मचारी असल्याने पोलीस खात्याची बदनामी नको म्हणून कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप अंकुश ठोंबरेसह जनतेमधून केला जात आहे.
मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गुन्ह्याचा तपास लावला असून शेेवगांव उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू हप्तेखोरीची तक्रार येताच तातडीने त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.तशीच भुमिका एसपी साहेब घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एवढा मोठा गंभीर तक्रार असताना कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी बघ्याची भूमिका घेत असल्याने जनतेत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे ?
कर्जत तालुक्यातील अंकुश ठोंबरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची दि. ७ व ११ ऑक्टोबरला भेट घेऊन कर्जतच्या त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावासह लेखी तक्रार अर्ज दिला आहे. तो अर्ज पुढील तपासाकामी उपविभागीय पोलीस अधिका-यांडे पाठविण्यात आला. त्यानुसार जाबजबाब घेवुन तो अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षक यांना अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार एसपी साहेब कारवाई करणार असल्याचे समजते. हे प्रकरण दाबण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. राजकीय दबावतंत्राचा वापर केला जात असला तरी अशा दबावाला मी भित नाही अशी भुमिका ठोंबरे यांनी घेतल्याने त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मेहेत्रे, खैरे, लातुरकर या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी अंकुश ठोंबरे यांच्याकडे दमबाजी करून हजारो रुपये फोन पे वर तर तब्बल लाखो रुपये रोख अशी रक्कम घेतली असल्याचे ठोंंबरे यांचे म्हणने आहे. त्यामुळे संबंधीत पोलीसांना उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पाठीशी न घालता खातेनिहाय चौकशी करुन कठोर कारवाई करावी.व आम्हाला लोकशाही पध्दतीने न्याय मिळवून देण्यात यावा. न्याय न मिळाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल.असे अंकुश ठोंबरे यांनी आमच्या दैनिक जलभूमी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...