शेवगांव तालुक्यासाठी अतिवृष्टीचे १० कोटी प्राप्त - डॉ. क्षितिज घुले - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

शेवगांव तालुक्यासाठी अतिवृष्टीचे १० कोटी प्राप्त - डॉ. क्षितिज घुले

घुलेंच्या प्रयत्नांना यश, ११ गावाच्या याद्या पूर्ण

दिपक खोसे 
ढोरजळगांव / जलभूमी वृत्तसेवा 

शेवगाव तालुक्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्याचे माजी. आ. चंद्रशेखर घुले , जिल्हा परिषदचे अध्यक्ष सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले , पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले यांच्या प्रयत्नातून अतिवृष्टी व पुर परीस्थितीमध्ये नुकसान झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे १० प्राप्त झाले असून तालुक्यातील ११ गावांंना ५ कोटी ८९ लाख ९९ हजार ४५० रुपये तातडीने वाटप करण्यात येणार आहे.


शेवगाव (१६ लाख ५९ हजार) , वडुले बुद्रुक (२७ लाख ७३ हजार), खरडगाव ( ५२ लाख ७४ हजार ), जोहरापूर ( ३ लाख ५२ हजार २५० ), खामगाव ( १ लाख १३ हजार ५०० ), आखेगाव ति.( २८ लाख ७२ हजार २०० ), आखेगाव डोंगर ( १२ लाख ८ हजार ७०० ) , वरूर खुर्द ( १५ लाख १४ हजार ९०० ), वरुर बुद्रुक ( ७५ लाख ५६ हजार ), भगुर ( ३७ लाख ३७ हजार ८००), कांबी ( १ कोटी १९ लाख २३ हजार ९००), गायकवाड जळगाव ( ५६ लाख १४ हजार २०० ) गावानुसार ती वितरित होणार आहे. तसेच पुर परीस्थितीमधील सर्व गावांतील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणून १० कोटी रुपये रक्कम प्राप्त झाले असल्याचे सभापती डॉ. घुले यांनी बोलताना सांगितले. डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नांमुळे व पाठपुरावा केल्यामुळे हे सर्व नुकसान भरपाईचे अनुदान प्राप्त झाले आहे व ते लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.शेवगाव तालुका व पुरपरिस्थिमुळे सर्व गावांचे सरपंच व गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने घुलेंचे आभार व्यक्त केले जात आहे.

११ गावाचे काम पूर्ण उर्वरित गावाचे काम लवकरच- वाघ

ऑगस्ट , सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात उद्भवलेल्या शेती पिके बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठीचे नियोजन युध्द पातळीवर चालू आहे.११ गावाच्या याद्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावाच्या याद्या करण्याच्या काम चालू आहे. ते लवकरच काम पूर्ण होईल.व तातडीने संबधित शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात येईल.
छगन वाघ
तहसिलदार, शेवगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...