वाळु वाहतूकीसाठी १ लाख ३० हजाराची मागणी भोवली
जायकवाडी / जलभूमी वृत्तसेवा
-----------------------------------
वाळुचे उत्खनन करून वाहतुकीसाठी वाहतुकदाराकडुन लाच मागणाऱ्या पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचा पंटर नारायण वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री फिर्याद दाखल केली. यावरुन तहसीलदार व त्यांच्या पंटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, दोन वर्षापुर्वी पैठणचे तत्कालीन तहसीलदार यांच्या वर दिवाळी दरम्यान लाच प्रकरणी कारवाई झाली होती.
तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यावसाय असुन तक्रारदाराच्या भागीदारीत असणा-या शिवपुर येथील शेतात अतिवृष्टीमुळे नदीचा वाळूसाठा झाला होता, दरम्यान या वाळुचा उपसा करणे व दोन हायवेद्वारे वाहतूकीसाठी तहसीलदार यांचा पंटर असलेला खासगी इसम नारायण वाघ यांने शुक्रवारी लाचलुचपत अधिका-यांच्या उपस्थित पैठण तहसील कार्यालयात पंच साक्षीदार एक लाख तिस हजारांची मासिक हप्ता स्वरुपात मागणी केली,
यानंतर तक्रारदार व पंच यांनी तहसीलदार शेळके यांची कक्षात भेट घेतली असता, तहसीलदार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्या बदल बोलनी करून नारायण वाघ यांना समक्ष भेटुन बोलनी करून नारायण वाघ यांने केलेल्या लाच मागणीचे समर्थन करुन लाच घेण्यास प्रोत्साहन दिले.
यानंतर पुन्हा वाघ यांनी तक्रार दाराकडे पंच साक्षी समक्ष एक लाख ३०हजार लाचेची मागणी केली, पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षिरसागर, पोलिस उप अधीक्षक मारुती पंडित, पोलिस निरीक्षक संदिप राजपूत, यांनी लावलेल्या सापळ्यात तहसीलदार व पंटर अडकला असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...