जलभूमी ग्रामीण पत्रकार, समाजसेवक,वकील, डॉक्टर, महिला मंच सभासद नोंदणीस आजपासून प्रारंभ - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

जलभूमी ग्रामीण पत्रकार, समाजसेवक,वकील, डॉक्टर, महिला मंच सभासद नोंदणीस आजपासून प्रारंभ

सभासद ऑनलाईन अर्जाचा देवगडला भास्करगिरी बाबांच्या हस्ते लोकार्पण
 
अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा 
---------------------------------

दैनिक जलभूमी वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करत असताना जलभूमी फाऊंडेशनची स्थापना करून जलभूमी संपादक, ग्रामीण पत्रकार संघ, महिला मंच, सामाजिक संघटना, वकील, डॉक्टर, वृत्तपत्र विक्रेता या संघटनेचे सभासद होण्यासाठी ऑनलाइन फॉर्मचे ( अर्ज लिंक ) देवगडचे गुरुवर्य ह.भ. प. भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब जाधव व शंकरराव मरकड यांनी दिली. 



आज गुरुवार दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 4:00 वाजता देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रकाशित करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रातील व्यक्तींना लोकार्पण सोहळा झाल्यानंतर जलभूमीचे अधिकृत सभासद होण्यासाठी www.jalbhumi.com किंवा www.jalbhumi.in या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवम जाधव, दिपक खोसे, सुनील रणमले, सलीम शेख, शिवाजी खरड, ईश्वर वाघमारे यांच्यासह जलभूमी परिवाराने दिली आहे. महाराष्ट्र सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो. 9834967767 संपर्क साधावा. 

लवकरच कार्यकारणी जाहीर करणार - मरकड 

आज दुपारी चार वा. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींंना जलभूमी परिवाराचे सभासद होण्यासाठी संस्थेच्या वेबसाईटवर व लिंकव्दारे सभासद अर्ज भरता येणार आहे. सभासदातून राज्य, जिल्हा, तालुका, गाव पातळीवर पदाधिकारी निवड करून लवकरच कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. संघटनेत काम करु इच्छिणाऱ्या व्यक्तीनी ऑनलाईन सभासद अर्ज सादर करावा, असे आवाहन दैनिक जलभूमीचे निवासी संपादक शंकरराव मरकड यांनी केले आहे. 


 

दोनशे व पाचशे रुपये सभासद फी 

जलभुमीचे सभासद होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. सभासद फी दोन प्रकारे ठेवण्यात आली आहे. 200 रुपये सभासद फी मध्ये संस्थेचे ओळपत्र, जलभूमी दिनदर्शिका, जलभूमी पेन भेट देण्यात येणार आहे. 500 रुपये फीमध्ये ओळखत्र, जलभूमी डायरी, जलभूमी पेन, जलभूमी दिनदर्शिका भेट देण्यात येणार आहे.ना नफा, ना तोटा या तत्वावर सभासद फी ठेवण्यात आली आहे. समाजसेवेची आवड असणाऱ्या व्यक्तींनाही सभासद होता येणार आहे. जलभूमी समाजसेवक म्हणून संस्थेतर्फे ओळखपत्र देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...