श्रीकांत मापारी यांचा राजीनामा माझ्याकडे पोहचला असुन मी त्यांच्याशी संपर्क करणार आहे- जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके
जलभूमी : लोणी
महाराष्ट्राचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व आमदार डाॅ सुधीर तांबे यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीकांत तान्हाजी मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्याकडे सुपुर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा आहे.
काँग्रेसचे नेतृत्व ना. बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी मोठ्या विश्वासाने अ.नगर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस पदासह राहुरी नगरपालिका काँग्रेस निरीक्षक म्हणून श्रीकांत तान्हाजी मापारी यांची निवड केली होती. त्या विश्वासाला सार्थ ठरवित विश्वासपात्र काम त्यांनी केले आहे.
या राजीनाम्याबाबत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता राजीनामा माझ्यापर्यंत पोहचला असुन श्रीकांत मापारी यांचे काम चांगले असुन मी त्यांना संपर्क करणार आहे. अद्याप त्यांच्याशी माझा संपर्क झाला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
जिल्हाध्यक्ष यांना दिलेल्या राजीनामा पत्रकात म्हटले आहे की, यापुढेही काँग्रेस पक्षासह ना. थोरात साहेब व आ. डॉ. तांबे साहेब यांच्या विचारांची पाणपोई जनसामान्यांच्या तळगळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अहोरात्र काम करणार असून त्यासाठी आम्ही जन्मभर कटिबद्ध आहोत. परंतु घरघुती व व्यक्तीगत कारणास्तव मी अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस पदासह राहूरी नगरपालिका कॉग्रेस निरीक्षक पदाचा राजीनामा देत असुन त्याचा स्विकार करण्याची विनंती त्यांनी केली असुन त्या राजीनाम्याच्या प्रती ना थोरात साहेब व आ तांबे साहेब यांना पाठवल्या आहे.
मापारी हे शिर्डी विधानसभा मतदार संघातील नामदार बाळासाहेब थोरात यांचे अतिशय विश्वासु आक्रमक कार्यकर्ते असुन शिर्डी मतदारसंघातील सर्वच बाबीवर रोखठोक न डगमगता प्रतिक्रिया देणारा कार्यकर्ता असुन काँग्रेस पक्षाला पडत्या काळात साथ देऊन स्वतःला झोकुन वाहुन घेऊन त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळेच त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...