अधिवेशन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
नगर ता.प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे ४९ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र एप्रिलमध्ये संगमनेर येथे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत खुले अधिवेशन व ठराव पारित होणार आहेत. तरी या अधिवेशन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा संघटनेचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, सचिव भानुदास दळवी यांनी केले आहे.
संगमनेर येथे होणाऱ्या अधिवेशनाची तयारी करण्यासाठी अहमदनगर येथील माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.परंतु काही प्रश्न आजही भेडसावत आहेत. यात प्रामुख्याने शिक्षकेत्तर सेवक भरती, जुनी पेन्शन योजना असे काही प्रश्न अद्यापही सुटलेली नाहीत.
त्यासाठी संघटनेचा पाठपुरावा चालू आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या विविध प्रश्नावर अधिवेशनामध्ये चर्चा करून विविध ठराव मंजूर करण्यात येणार आहे.अधिवेशनात संमत होणाऱ्या ठरावावर शासनदरबारी आवाज उठवून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्याच काम संघटना करणार आहे.
अधिवेशन व चर्चासत्रास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा प्रवास खर्च वेतन अनुदानास पात्र समजण्यात येईल.अधिवेशन उपस्थिती सेवाकाल म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
तरी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तन, मन, धनाने सहभागी व्हावे. व हे अधिवेशन यशस्वी करावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, सहकार्यावाह भानुदास दळवी, हिशोब तपासणीस किशोर मुथ्था, नेवासा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव,उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, निवृत्ती लोखंडे, जेष्ठ मार्गदर्शन क भाऊसाहेब थोटे,भाऊसाहेब काकडे,शिरीष राऊत, भागाजी नवले,जयराम धांडे,अमोद नलगे, नाना डोंगरे,विजय हराळे ,ज्ञानदेव शिंगोटे,भारत जावळे,राजाराम मोरे, सचिन बोरुडे, शरद जाधव, संजय शेवाळे,रमेश कुलकर्णी,प्रशांत सारंगधर, मंगेश वाघ, यशवंत सोनवने,भारत पाटील, ईश्वर कोळी याच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...