बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना इंटीमेशन
कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर भाजपाच्या किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव हे आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले असल्याने त्यांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात झोपून आत्महत्या करण्याचा इशारा यादव यांनी दिला आहे.
गुरुवारी सकाळी सुनिल यादव यांनी मिरजगाव रस्त्यावर जावून प्रवाशांशी संवाद साधला.
डिकसळनजिक प्रवाशांशी संवाद साधून व्हिडिओ तयार केला. त्यात त्यांनी या रस्त्यावरून प्रवास करत असताना निर्माण होत असलेल्या प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात आले नाही तर सोमवारी ( दि. २८) या खड्ड्यात झोपून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे. सोमवारी कशा पद्धतीने आंदोलन करणार त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
यादव यांनी या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे. त्यामुळे यादव यांनी हाती घेतलेला प्रश्न सोमवारपर्यंत सुटणार की यादव यांच्यावर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्याची वेळ येते, हे पाहणे महत्वाचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...