वडळा येथे स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

वडळा येथे स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण

भानसहिवरेंच्या कृषीदुतांचा अभिनव उपक्रम 

नेवासा प्रतिनिधी
 
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे कृषि महाविद्यालय भानसहिवरे येथील चवथ्या वर्षातील कृषिदुतानी 'रावे' (ग्रामीण कृषि कार्यनुभव) उपक्रमातंर्गत मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचे अवचित साधून वृक्षारोपण केले.



बी. एससी अँग्रीच्या चौथ्या वर्षातील कृषिदुतानी 'रावे' (ग्रामीण कृषि कार्यानुभव) उपक्रमाअंतर्गत मंगळवारी वृक्षारोपण केले. या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा  वडाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुरेश मोटे हे होते. गावचे सरपंच ललित दादा मोटे, उपसरपंच सचिन दादा मोटे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषिदुत प्रविण बोरुडे याने कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. वृक्षरोपणाचे महत्व सांगितले कार्यक्रमाचे संचलन  शिवसागर दोडोके, वैभव चापे यांनी केले. आभार प्रथमेश जामकर आणि अनिकेत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कृषि दुतानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक उबाळे सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका गावातील ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए तूर्भटमट सर कार्यक्रम समन्वयक एम.आर.माने सर प्राध्यापक यु.वी महाजन सर प्राध्यापिका जे.बी खकाळे मॅडम प्राध्यापक सागर साबळे, प्राध्यापक सागर सोनटक्के सर यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...