: प्रतिनिधी
-----------
श्रीरामपूर - युवा अवस्थेतील श्रमसंस्कारामधून आयुष्याची जडणघडण होते. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी शिबिर कालावधीत गावाचा जो विकास केला, त्याला तोड नाही. असेच देश उपयोगी कार्य आयुष्यात झोकून देऊन करा. त्यामुळेच प्रत्येक युवकाचे श्रमसंस्कार हे आयुष्य घडविणारी गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.शरद सोमाणी यांनी केले.
बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तालुक्यातील उंबरगाव येथील विशेष शिबिराच्या सांगता समारंभामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उंबरगावचे उपसरपंच डॉ. नंदकिशोर काळे, सौ. कावेरी काळे, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक बर्गे ,बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकनाना साळुंके तसेच पदाधिकारी अॅड विजय साळुंके प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. रूपाली उंडे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. अशोक थोरात, प्रा. प्रकाश देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ .संजय नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड.सोमाणी म्हणाले की, युवकांनी श्रमदानाबरोबरच विविध योजनांच्या सहाय्याने गावांचा विकास करावा.युवकांनी समाजाचे विविध अंगी प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येणे ही आजच्या काळाची गरज आहे. ॲड.विजय साळुंके, डॉ. नंदकिशोर काळे,अशोक बर्गे, डॉ गुंफा कोकाटे आदींनी शिबीरार्थींना मार्गदर्शन केले.सदर श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्रमदानातून ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, धार्मिक स्थळांची स्वच्छता, ग्राम सर्वेक्षण, लोकसंख्या नियंत्रण व पर्यावरण जनजागृती, शिवार फेरी विषयी रॅली, तसेच विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली.
यावेळी सारिका थोरात, प्रतीक माळी, प्रतीक्षा माळवदे, ज्ञानेश्वरी भांड आदी शिबिरार्थी स्वयंसेवकांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी वाडकर हिने केले तर आभार प्रा. डॉ.बाबासाहेब पवार यांनी मानले. सदर शिबिर यशस्वीतेसाठी उंबरगाव च्या सरपंच सुप्रियाताई भोसले, विराज भोसले , सोसायटीचे चेअरमन रवींद्र झरेकर तसेच विजय वारुळे, राजेंद्र मोहोळ ,नारायण कोळसे, तलाठी अशोक थोरात ,ग्रामसेवक रितेश ढुमणे, मुख्याध्यापिका कांबळे मॅडम सोमनाथ बारवकर, डॉ.शिल्पा थोरात, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेश खटोड,भरत साळुंके,रविंद्र खटोड व समस्त पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, संदेश शाहीर,रामेश्वर पवार सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी व उंबरगावचे ग्रामस्थ आदींनी अनमोल सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...