नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या विचारांचा युवकांवर प्रभाव - ससाणे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या विचारांचा युवकांवर प्रभाव - ससाणे

 : प्रतिनिधी

-----------

श्रीरामपूर - तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा' असा नारा देणारे  नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असामान्य व प्रतिभा शाली नेते होते. तर शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नेताजी सुभाष चंद्र बोस व  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. 



ससाणे पुढे म्हणाले की भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुभाष चंद्र बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली. ते क्रांतीकारकांचे स्फूर्ती स्थान होते. सुभाष चंद्र बोस यांच्या देशभक्तीने अनेक भारतीयांच्या मनावर कायमची छाप पाडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांनी सर्वप्रथम व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या असामान्य वकृत्वामुळे महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्याविषयी नेहमीच आदर होता.आपल्या असामान्य कर्तुत्वाने त्यांनी मराठी माणसांच्या मनात घर केले. याप्रसंगी नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक दिलीप नागरे, के.सी. शेळके, आशिष धनवटे, मर्चंट चे संचालक निलेश नागले, प्रवीण नवले,रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, अशोक जगधने, डॉ राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, युवराज फंड, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, रियाजखान पठाण, भगवान जाधव, युनुस पटेल, लक्ष्मण शिंदे, गणेश काते,संजय गोसावी, योगेश गायकवाड, अजय धाकतोडे, विशाल साळवे, सुरेश बनसोडे, राजेश जोंधळे, श्री पवार, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...